Nashik: प्रवाशांचा ‘खासगी’तून प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी वाहने

नाशिक : प्रवाशांचा ‘खासगी’तून प्रवास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्‍या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्‍हल्‍ससोबत आता खासगी शिवशाही रस्‍त्‍यावर धावू लागल्‍या आहेत. शुक्रवारी (ता.१२) नाशिकहून पुणे आणि धुळ्यासाठी प्रत्‍येकी तीन, अशा सहा खासगी शिवशाही बस सोडण्यात आल्‍या. याव्‍यतिरिक्‍त बसस्‍थानक आवारातून अन्‍य छोट्या-मोठ्या वाहनांतून प्रवासी वाहतूक सुरू होती.

बहुतांश आगारातील बससेवा शुक्रवारीही ठप्प राहिली. गुरुवार (ता. ११)पासून महामंडळाकडून खासगी शिवशाही रस्‍त्‍यावर उतरविण्यात आल्‍या आहेत. त्‍यात शुक्रवारी नवीन सीबीएस बसस्‍थानकावरून पुणे आणि धुळ्यासाठी प्रत्‍येकी तीन, अशा सहा बस सोडण्यात आल्‍या.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

दरम्‍यान, आंदोलनकर्ते कर्मचारी एन. डी. पटेल मार्गावरील महामंडळाच्‍या कार्यालयानजीकच्‍या आगार क्रमांक एकच्‍या आवारात ठाण मांडून होते. विविध संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

निलंबनाची कारवाई नाही अन्‌ आवाहनाला प्रतिसादही नाही

आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांवर प्रशासनातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात येत होती. मात्र, शुक्रवारी (ता.१२) एकाही कर्मचाऱ्याचे निलंबन केले नसल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाप्रमाणेच विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी या आवाहनालाही प्रतिसाद मिळाला नसल्‍याचे समजते.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

महिला कर्मचाऱ्यांचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न

आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. निलंबित केलेल्‍या महिला कर्मचाऱ्याने गुरुवारी (ता. ११) आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्‍याची बाब समोर आली आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागात एसटीची तोडफोड थांबवा ः भुजबळ

ग्रामीण भागातील काही ठिकाणी एसटी तोडफोडीच्‍या घटना घडल्‍या होत्या. या घटना तातडीने थांबविण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीत जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना दिल्‍या.

loading image
go to top