
Raksha Bandhan 2022 : चिमुकल्या विद्यार्थिनीचे पोलीस ठाण्यात अनोखे रक्षाबंधन
चांदोरी : भारतीय संस्कृतीत सण, उत्सव यांना अनन्यसाधारण महत्व आहे सर्वधर्म समभाव, ऐक्य, निरपेक्ष, निस्वार्थ, आपलेपणा जपणारे सण, उत्सव साजरे करून एकनिष्ठ असल्याची जाणीव या माध्यमातून होते.
रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असणारा सण आहे. या दिवशी बहीण भावला राखी बांधून आपले रक्षण करण्यासाठी साकडे घालते, भाऊ हातातील राखीचा धागा म्हणजे बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे विचार आत्मसात करतो.
हा उत्सव सगळीकडे आनंदात साजरा होत असला तरी आपल्या सर्वांचे रक्षण करणारे महाराष्ट्र पोलीस आपल्या कुटुंबा पासून दूर असतात शेकडो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बहिणीच्या रक्षाबंधना सारख्या अनोख्या सणाला आपल्या भावाला आणि भाऊ बहिणीला मिस करत असतात.
आपल्या पोलीस दादाला राखी बांधून त्यांच्या जीवनात आजच्या दिवशी असलेल्या बहिणीच्या प्रेमाची जागा भरून काढण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळोटी माथा शाळेतील मुलींनी सायखेडा पोलीस स्टेशनंमध्ये जाऊन सर्व पोलीस बांधवाना राख्या बांधल्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी वाय कादरी हे या अनोख्या रक्षाबंधन निमित्ताने चिमुकल्या मुलींनी दिलेली अनोखी भेट ही अविस्मरणीय आणि जाणीव करून देणारी असल्याचे गौरउदगार काढले. यावेळी सर्व पोलीस बांधव क्षणभर भावुक झाले यावेळी मुलींनी राखी बांधून पेढा भरवला, पोलीस बांधवानी मुलींना शालेय साहित्य, केळी, बिस्कीट देऊन भविष्यात मोठे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस ढेकळे यांनी पोलीस आपल्याला कशी मदत करतात आणि पोलीस जवळ असलेलं साहित्य कसे आणि कधी हटाळतात हे समजावून दिले. गोदाकाठमध्ये पोलीस स्टेशनंमध्ये जाऊन रक्षाबंधन साजरे करणारी पहिलीच शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते.या अनोख्या रक्षाबंधनाची दिवसभर गोदाकाठमध्ये चर्चा सुरु होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी वाय कादरी, ढेकळे,गायकवाड, तेलोर, येशी, गीते, कर्डक, कहांडळ यासह पोलीस बांधव उपस्थित होते शिक्षक बाजीराव कमानकर यांनी यावेळी पोलिसांचे आभार मानले.