Cricket Live Broadcast : सर्व सामन्यांचे आता थेट प्रक्षेपण; नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे डिजिटल पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Live Broadcast

Cricket Live Broadcast : सर्व सामन्यांचे आता थेट प्रक्षेपण; नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे डिजिटल पाऊल

नाशिक : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनने सर्व सामन्यांचे थेट प्रसारण करण्याचे निश्चित केले आहे.

स्पोर्ट वोट, मुंबई व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सामन्यांचे प्रसारण करेल आणि एन. डी. सी. ए. अंतर्गत सर्व खेळाडूंची माहिती संकलित करण्यात येणार आहे. (Live broadcast of all matches now Digital step of Nashik District Cricket Association nashik news)

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे यांनी सांगितले, की आमचे डिजिटल सहयोगी म्हणून स्पोर्ट वोटची निवड केल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. काळाच्या ओघात या खेळाचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलले आहे.

खेळाच्या उच्च स्तरावर होणारे बदल व त्यामुळे स्पर्धेत होणारे बदल लक्षात घेता स्थानीय स्तरावरदेखील तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची वेळ आली आहे. जिथे पहिल्यांदा खेळाडूंच्या प्रतिभेच्या खुणा दिसतात.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

स्पोर्ट वोटसोबत आम्ही नाशिकमधील क्रिकेट प्रतिभा केवळ जगासमोर आणण्याचा विचार करत नाही आहोत. तर खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी आणि प्रशिक्षकांना प्रतिभा ओळखण्यासाठी अधिक चांगल्या मार्गांनी मदत करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आमचा बेत आहे, असेही ते म्हणाले.

स्पोर्टवोटच्या सह-संस्थापक शुभांगी गुप्ता या म्हणाल्या, प्रत्येक खेळाडूच्या खेळाचा, त्याच्या रेकॉर्डस्चा मागोवा ठेवते आणि प्रत्येक माहिती जतन करून ठेवली जाईल. एन. डी. सी. ए. सह स्पोर्ट वोटची नाशिकमधील दोन हजारांहून अधिक उदयोन्मुख क्रिकेटपटूंना त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक व्यासपीठ देण्याची योजना असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :CricketNashikdigital