LLB CET Exam : एलएलबी सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू; या तारखेपर्यंत मुदत.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LLB Admission

LLB CET Exam : एलएलबी सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू; या तारखेपर्यंत मुदत..

नाशिक : विधी शाखेतील एलएलबी (LLB) या पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे आयोजित या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली आहे. (llb cet exam Deadline 25 March for 3 years duration and 23 March for LLB of 5 years duration nashik news)

तीन वर्षे कालावधीच्‍या एलएलबीसाठी २५ मार्च आणि पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबीसाठी २३ मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहे. त्‍याअनुषंगाने विधी शाखेतील पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या परीक्षेची नोंदणी सुरु झालेली आहे.

इयत्ता बारावीची पात्रता असलेल्‍या पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या परीक्षेसाठी १४ मार्चपर्यंत मुदत दिलेली होती. या मुदतीत वाढ करण्यात आलेली असून, २३ मार्चपर्यंत वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरता येतील. तर पदवीची पात्रता असलेल्‍या तीन वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमासाठी परीक्षा अर्ज भरण्यासाठी २५ मार्चपर्यंत असणार आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया होणार पूर्ण

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची प्रवेश प्रक्रिया दीर्घ काळ लांबलेली असल्‍याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्‍यक्‍त केली जात होती. परीक्षेसही विलंब होणार असल्‍याने प्रवेश प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्‍यक्‍त केली जात होती.

त्‍यानुसार सीईटी सेलतर्फे प्रवेशाबाबत तारखांची घोषणा केलेली आहे. त्‍यानुसार पाच वर्षे एलएलबीची प्रवेश प्रक्रिया १२ जुलैपर्यंत आणि तीन वर्षे कालावधीच्‍या एलएलबीच्‍या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १८ जुलैपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. यामुळे अध्ययन प्रक्रिया वेळीच सुरु होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :NashikCETLLB