स्थानिक संस्था निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार?

मतदार याद्यासाठीच्या मतदार नोंदणीविषयक नियमातील बदल हे त्यामागील कारण ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
elections
electionsEsakal

नाशिक : ओबीसी आरक्षण (OBC Reservation), न्यायालयाचे निकाल यांसह नानाविध मुद्द्यांवरून पुढे ढकलत आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आणखी एक मुद्दा चर्चेत येऊ शकतो. मतदार याद्यासाठीच्या मतदार नोंदणीविषयक नियमातील बदल हे त्यामागील कारण ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. नवीन बदलेल्या नियमांचा आधार घेतल्यास निवडणुका पुन्हा लांबणीवर पडू शकतात.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता मतदारयादीच्या मुद्द्यांवर पुढे जाऊ शकतात. लोकप्रतिनिधी अधिनियम-१९५० अंतर्गत आणि मतदार नोंदणीविषयक नियम-१९६० मधील नव्या बदलांनुसार १ एप्रिल २०२२ आणि १ जुलै २०२२ या अर्हता तारखेवर आधारित ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होईल, ते सर्व तरुण मतदारसुद्धा मतदार नोंदणीसाठी पात्र होतील आणि ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काहीसा कालावधीसुद्धा लागू शकतो. केंद्र सरकारच लोकप्रतिनिधी अधिनियम-१९५० अंतर्गत मतदार नोंदणीविषयक नियम-१९६० मधील या नवीन बदलांची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२२ पासून केली जाणार आहे.

elections
नाशिक महापालिका क्षेत्रात अकरावीच्‍या साडेबावीस हजार जागा
elections
निरंतर हवाई सेवेपासून नाशिककर वंचित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com