नाशिक: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारसंख्या, मतदान केंद्रे, तसेच त्या केंद्रांवरील मूलभूत सोयी-सुविधांची तयारी करून ठेवावी. निवडणूक यंत्रणा, मनुष्यबळ, मतदान यंत्रांची उपलब्धता यांचे योग्य नियोजन व्हावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.