नाशिक औष्णिक केंद्रावर अन्याय नको; नागरिकांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Thermal Power Corporation

नाशिक औष्णिक केंद्रावर अन्याय नको; नागरिकांची मागणी

एकलहरे (नाशिक) : शासन स्तरावर सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्पासाठी हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात एनटीपीसीच्या समितीनेही पाहणी केली आहे. येथील संच जरूर सुरू व्हावेत पण नाशिक औष्णिक वीज केंद्राचा बळी मात्र दिला जाऊ नये अशी पंचक्रोशीतील नागरिकांची भावना आहे.

सिन्नर (गुळवंच) येथील रतन इंडियाचे संच बनले तेव्हापासून ते बंदच आहेत. हे संच कार्यान्वित झाले नाही. त्यांना पुन्हा सुरू करण्यासाठी जो खर्च येणार आहे त्या किंमतीत एकलहरे येथे नवा संच उभारला जाईल असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. या प्रकल्पासाठी ज्या बँकेचे कर्ज घेतले गेले त्याचे व्याज मुद्दलच्या दुप्पटीत गेले असून याचा भार जनतेने का सोसावा असे मत नागरिकांचे आहे.

नाशिक औष्णिक वीज केंद्रात आज सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असतांना ही नाशिककडे कानाडोळा केला जातोय. तर खासगी रतन इंडियासाठी पायघड्या घातल्या जाताय हे कितपत योग्य आहे. जर रतन इंडियाची वीज एमओडीत बसणार आहे तर नाशिक औष्णिकला नवीन प्रकल्प बनविला तर येथील दरात कमी नाही येणार का, की ही बाब हेतुपुरस्सर दुर्लक्षित केली जात आहे. आज वर जेव्हाही महानिर्मितीवर वीजेचे संकट आले आहे तेव्हा नाशिक केंद्राने आपली भूमिका पार पाडली आहे, असे असताना नाशिक औष्णिक वीज केंद्र दुर्लक्षित का हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

हेही वाचा: तुकडेबंदी कायद्यावर फुली; जमीन खरेदी-विक्री व्यवहारांना मिळणार गती

''रतन इंडियाचा प्रकल्प सुरू करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू असून तशा बैठका ही झाल्याचे समजते. मात्र शासनाने प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहिली आहे का? प्रकल्प बऱ्याच वर्षांपासून रखडला असल्याने तो कार्यान्वित करण्यासाठी भरपूर खर्च येणार आहे. त्यातूनही पुन्हा विजेचा दर MOD बसला पाहिजे.'' - शंकरराव धनवटे (अध्यक्ष, प्रकल्प बचाव संघर्ष समिती)

''एकलहरे प्रस्तावित प्रकल्प SUPERCRITICAL तंत्रज्ञान वर आधारीत असणार आहे, त्यामुळे त्याची निर्मीती क्षमता जास्त असून विजेचा दरही कमी असेल. तसेच इथे कुठलेही भूसंपादन करण्याची गरज नसल्याने भांडवली खर्चही अत्यंत कमी असणार असून कमीत कमी वेळात कार्यान्वित होईल. शासनाने व्यवहार्यता तपासून निर्णय घ्यावा.'' - अनिल जगताप, माजी उपसभापती पंचायत समिती

हेही वाचा: रॉकेल मिळेना आणि गॅस परवडेना; सामान्य गृहिणींना बसतोय फटका

Web Title: Local Residents Efforts To Save Nashik Thermal Power Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
go to top