Sudam Jundre
sakal
देवळाली कॅम्प: लोहशिंगवे (ता. नाशिक) येथे शुक्रवारी (ता. ७) पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुदाम जुंद्रे या तरुणाचा मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास गावात घडलेल्या या घटनेमुळे दारणाकाठ हादरला असून, ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीसह संतापाचे वातावरण आहे. या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.