
नाशिक : ठेंगोडा येथे धाडसी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास झाल्याने खळबळ
ठेंगोडा (जि. नाशिक) : येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाखांची रोकड व जवळपास सहा लाखांच्या सोन्यावर डल्ला मारला. अनेक दिवसांपासून गाव व परिसरात लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच ठेंगोडा येथून ट्रॅक्टरची नवी ट्रॉली चोरट्यांनी चोरून नेली होती. अशा चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने ठेंगोडा परिसरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
ठेंगोडा येथील अण्णा भाऊ साठेनगर मधील महाराष्ट्र बँडचे मालक दिनेश अण्णा पगारे परिवारासह सोमवारी हरेश्रवर पिंपळगाव (चोपडा) येथे कार्यक्रमास गेले होते. मंगळवारी (ता. २२) रात्री साडेदहाच्या सुमारास ठेंगोडा येथे आले असता त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सटाणा पोलिसांत कळवले असता पोलिस निरीक्षक सुभाष अनुमोलवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षक राहुल गवई, पोलीस नाईक अजय महाजन, विजय वाघ, जिभाऊ पवार स्थानिक गुन्हे शाखेचे भगवान निकम, नामदेव खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा: नाशिक : जावयाची गाढवावरुन धिंड; वडांगळीकरांची अनोखी प्रथा
चोरांनी आठ लाखांची रोकड व सोन्याच्या दागिन्यंत अंगठ्या, मंगलपोत, ब्रासलेट, गोफ, ठुशी, माळ, नेकलेस असे जवळपास सहा लाखांचे दागिने मिळून चौदा लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीची तक्रार दिनेश पगारे यांनी दिली असून, सटाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, याबाबत घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चंदकांत खांडवी, पोलिस उपअधीक्षक पुष्कराज सुर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील यांनी भेट देऊन तपासाबाबत योग्य सुचणा दिल्या असुन पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार करीत आहेत.
हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात दीड लाख वीजग्राहकांना बारा कोटींची दंड व व्याजमाफी
Web Title: Looted 14 Lakhs In A Burglary At Thengoda Nashik Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..