esakal | न्यायाची अपेक्षा...भेसळयुक्त कांदा बियाण्यांमुळे शेतकऱ्याला 'असा' बसला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

onion loss.jpg

देवरे यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात पावसाळी कांद्याची लागवड केली आहे. यासाठी गावातीलच एका कृषी सेवा केंद्रातून त्यांनी 7 जुलै 2019 ला 11 हजार 700 रुपये किमतीचे चव्हाण बीज (बीएन 53) या कंपनीचे 13 किलो कांदा बियाणे खरेदी केले होते. यानंतर गादी वाफ्याद्वारे रोपनिर्मिती करून ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात रोपाची तीन एकर क्षेत्रात लागवड केली. लागवड केलेला कांदा आज जवळपास चार महिन्यांचा झाला आहे. मात्र...

न्यायाची अपेक्षा...भेसळयुक्त कांदा बियाण्यांमुळे शेतकऱ्याला 'असा' बसला फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वीरगाव (ता. बागलाण) येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश देवरे यांच्यावर भेसळयुक्त कांदा बियाण्यांमुळे तीन एकर क्षेत्रातील लाल कांद्यावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे श्री. देवरे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कांदा बियाणे विक्री करणाऱ्या बीज (बीएन 53) या कंपनीकडे दाद मागितली असता कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने शेतकऱ्याने अखेर कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. 

लाखो रुपयांचा फटका

देवरे यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात पावसाळी कांद्याची लागवड केली आहे. यासाठी गावातीलच एका कृषी सेवा केंद्रातून त्यांनी 7 जुलै 2019 ला 11 हजार 700 रुपये किमतीचे चव्हाण बीज (बीएन 53) या कंपनीचे 13 किलो कांदा बियाणे खरेदी केले होते. यानंतर गादी वाफ्याद्वारे रोपनिर्मिती करून ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात रोपाची तीन एकर क्षेत्रात लागवड केली. लागवड केलेला कांदा आज जवळपास चार महिन्यांचा झाला आहे. मात्र या कांदा पिकाची गळती न होता पिकातील 70 टक्के पिकाला दुभाळके तसेच डोंगळे आल्याचे, तर लाल कांदा चक्क पिवळ्या व पांढऱ्या रंगाचे दिसत आहे. तीन एकर क्षेत्रातून अवघा 30 क्विंटल कांदाही निघणे कठीण झाल्यामुळे बियाणे विक्रीद्वारे मोठी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कांदा पिकातून लाखो रुपयांचा फटका बसल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळून संबंधित बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी कृषिमंत्री भुसे, आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. 

 बियाणे कंपनीवर कारवाईसाठी कृषिमंत्र्यांना निवेदन 
फसवणुकीबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडे तसेच कृषी विभागाकडे दाद मागितली आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्षात कांदा पिकाला भेट देऊन वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. तसेच पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांनीही पिकाची पाहणी करून कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. यंत्रणेकडून न्यायाची अपेक्षा आहे, अन्यथा ग्राहक मंच व न्यायालयीन लढा देणार आहे. -सुरेश देवरे, शेतकरी, वीरगाव 

VIDEO : "माझा फोन टॅप केला असेल तर समजेल की मी किती उत्तम शिव्या देतो" - संजय राऊत
प्रत्यक्ष शेतात जाऊन कांदा पिकाची पाहणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले आहे. पंचायत समिती कृषी विभागाची येत्या दोन ते तीन दिवसांत महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, यात संबंधित बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींनाही बोलावून चौकशी केली जाणार आहे. -प्रणव हिरे, कृषी अधिकारी, बागलाण पंचायत समिती 

"कॉंग्रेसवर आरोप सूर्यावर थुंकण्यासारखे" - संजय राऊत

loading image