VIDEO : ह्रदयद्रावक! एक तपापूर्वी हरवलेला बाप मिळाला आणि आंग्रे कुटुंबीय अक्षरशः गहिवरले. 

deore family.jpg
deore family.jpg

सोयगाव (जि.नाशिक) : बारा वर्षांपूर्वी मनमाड-मालेगाव रस्त्यावरून पायी चालून बबन धोंडू आग्रे ही व्यक्ती भूक-तहानेने व्याकूळ अवस्थेत वऱ्हाणे गावाजवळ असलेल्या कृष्णा हॉटेलजवळ पोचली. बराच वेळ होऊनही कोणाचेच त्यांच्याकडे लक्ष नव्हते. मात्र हॉटेलमालक किरण देवरे यांचे या आगंतुकाकडे लक्ष गेले. आणि मग....

बारा वर्षांपूर्वी घडली घटना..हरवला बाप
बारा वर्षांपूर्वी मनमाड-मालेगाव रस्त्यावरून पायी चालून बबन धोंडू आग्रे ही व्यक्ती भूक-तहानेने व्याकूळ अवस्थेत वऱ्हाणे गावाजवळ असलेल्या कृष्णा हॉटेलजवळ पोचली. बऱ्याच वेळ होऊनही कोणाचेच त्यांच्याकडे लक्ष नव्हते. मात्र हॉटेलमालक किरण देवरे यांचे या आगंतुकाकडे लक्ष गेले. देवरे यांनी आग्रे यांची विचारपूस केली. मात्र त्यांना काहीच सांगता येत नव्हते. देवरे यांनी त्याला हॉटेलवर जेवण दिले. 
 

बघता बघता ते देवरे कुटुंबाचे सदस्यच बनले
दोन ते तीन दिवस त्यांनी हॉटेलवरच माणुसकीच्या भावनेने आसरा दिला. दरम्यान, त्यांना गावचे नाव सांगता येत नव्हते. देवरे यांनी त्यांना मेहुणे येथील त्यांच्या घरी थांबवले. आग्रे शेतमळ्यात तसेच त्यांना आवडेल ते काम स्वतःहून करू लागले. बघता बघता ते देवरे कुटुंबाचे सदस्यच बनले. बारा वर्षे त्यांनी मेहुणे येथे देवरे कुटुंबीयांसोबत मुक्काम केला. बारा वर्षांत देवरे यांनी अनेकदा आंग्रे यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. मात्र तो निष्फळ ठरला. देवरे यांचे बंधू योगेश दिवाळीसाठी गावी आले असता त्यांनी सहजच आंग्रे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गगोली गावी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी फेसबुकवरून आंग्रे आडनाव असलेल्या व्यक्तींना संदेश पाठवला. त्यात योगायोगाने आंग्रे यांच्या मुलाचे नाव शोधण्यास यश लाभले. आंग्रे यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती मिळाली व संपर्क झाला. संदेशाची देवाणघेवाण झाली. ओळख पक्की झाली आणि आंग्रे कुटुंबाच्या पित्याचा शोध फेसबुकच्या भिंतीवरून थेट घरात पोचला. 

आणि आंग्रे कुटुंबीय अक्षरशः गहिवरले. 
मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावात बारा वर्षांपूर्वी शेतीच्या बांधावर एक आगंतुक थांबला. देवरे कुटुंबाने त्याला आसरा दिला. कोकणातील गुहागर सोडून आलेली ही व्यक्ती देवरे कुटुंबाचा सदस्य बनून राहत होती. या गतिमंद व्यक्तीला त्याचं घर मिळवून देण्याची किमया सोशल मीडियाच्या बळावर साध्य झाली आणि एक तपापूर्वी हरवलेला बाप मिळाल्याने गुहागर येथील आंग्रे कुटुंबीय अक्षरशः गहिवरले. 

देवरे परिवाराच्या दातृत्वावर शाबासकीची थाप
रविवारी (ता. २२) त्यांचे लहान बंधू, पत्नी व मुले सर्वजण त्यांना घेण्यासाठी आले. तब्बल बारा वर्षांनंतर कुटुंबातील सदस्य भेटल्याने सर्वांना गहिवरून आले. बारा वर्षे पित्याचा सांभाळ करणाऱ्या देवरे कुटुंबीयांचे कृतकृत्य भाव व्यक्त केला. यामुळे दोन कुटुंबात सेवाव्रतातून आपलेपणाचा अनोखा सेतू बांधला गेला. आंग्रे यांना घेऊन आंनदाने ते आपल्या घरी रवाना झाले. तब्बल बारा वर्षांपासून दुरावलेले वडील देवरे कुटुंबाच्या दातृत्वाने आणि फेसबुकच्या किमयेमुळे मिळाले. या अनोख्या भेटीची आश्चर्यमिश्रित चर्चा परिसरात होत आहे. देवरे परिवाराच्या दातृत्वावर शाबासकीची थाप उमटत आहे. 

बारा वर्षांपूर्वी माझा मोठा भाऊ घरातून निघून गेला होता. आम्ही त्याचा भरपूर शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. मात्र किरण देवरे यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाद्वारे त्याचा तपास करत माझ्या भावाची व त्यांच्या मुलाची बारा वर्षांनंतर भेट घडून आणली. त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. - गणपत आंग्रे, भाऊ  

तब्बल एक तप म्हणजेच बारा वर्षे

गतिमंद असल्याने रत्नागिरीचे एक गृहस्थ भरकटले आणि थेट पोचले ते मालेगावच्या कृष्णा हॉटेलवर. भुकेने व्याकूळ असलेल्या या वाटसरू माणसाप्रति माणुसकी दाखवत किरण देवरे यांनी त्यांना अन्न, वस्त्र दिले आणि निवाराही... निवारा देताना तो एक- दोन दिवस नाही, तर तब्बल एक तप म्हणजेच बारा वर्षे त्यांच्याकडे राहिले ते कुटुंबातील एक सदस्य म्हणून. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com