Latest Marathi News | लंपीचा धसका पितृपक्षावरही; पितरांचा घास घालायला मिळेना गो- माता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lumpy Disease effect news

Nashik : लंपीचा धसका पितृपक्षावरही; पितरांचा घास घालायला मिळेना गो- माता

नाशिक : जिल्ह्यात सिन्नरनंतर आता इगतपुरीत आठ जनावरांना लंपी रोगाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. एका जनावरांच्या लागणनंतर परिघातील पाच किलोमीटर क्षेत्रातील जनावरांचे लसीकरण करावे लागत असल्याने लंपीच्या भीतीने पितृपक्षातील पितरांचे घास गायींना देण्यास गोपालक प्रतिबंध करीत आहेत. (Lumpy disease effect on Pitrupaksha Nashik Latest Marathi News)

राज्यात गोवंश जनावरांमध्ये ‘लंपी’ स्किन आजार मोठ्या प्रमाणावर फैलावतो आहे. या संक्रमक व सांसर्गिक आजारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यात तालुकानिहाय स्थळ भेटीद्वारे जनावरांसाठी लंपी आजार लसीकरण मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. एक जनावराला लागण झाल्याचे पुढे येताच. त्या स्थळापासून पाच किलोमीटर परिघात लसीकरण मोहीम राबविली जाते.

सिन्नर इगतपुरीत लागण

जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात पांगरी व दुसंगवाडी, देसवंडी व गुळवंच या गावातील जनावरांत ‘लंपी’आजाराचा संसर्ग दिसून आला आहे. संसर्ग केंद्रांपासून पाच किलो मीटर बाधित क्षेत्र म्हणून प्रतिबंधित करण्यात आले आहे. राज्यात शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक कोटी रुपयांचा निधी ‘लंपी’ आजार लस खरेदी व यासंदर्भातील प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनासाठी वितरित करण्यात आला आहे.

हेही वाचा: Kumbh Mela : सिंहस्थ कामांचा शंखनाद; शहरात 60 किलोमीटरचा बाह्य रिंगरोड

तालुकानिहाय प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकारी यांनी स्वत: स्थळभेट करून जनावरांची तपासणी करून लसीकरण करावे, अशा शासनाच्या सूचना आहेत. सिन्नर पाठोपाठ इगतपुरीत तालुक्यातील काळुस्ते ३, बोरटेंभे ३, वासळी २ या प्रमाणे ८ जनावरांना लंपीचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे.

पितृपक्षावर प्रभाव

लंपी रोगाच्या लागणमुळे पशुपालक जनावरांची काळजी घेऊ लागले आहेत. गावागावात गोचिड, डास निर्मूलन व स्वच्छता मोहीम सुरु झाल्या आहेत. उघड्यावर बांधली जाणारी जनावरे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, सध्याच्या पितृपंधरवड्यात त्याची प्रचिती येत आहे. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध घातले जातात.

त्यात, कावळ्यासोबत गायीना पितरांच्या स्मरणात पान भरुन खायला दिले जाते. पण यंदा मात्र, बहुतांश भागात जनावरांना असे अन्न खाऊ देण्यास गोपालकांकडून प्रतिबंध केला जातो आहे. जनावरांची काळजी घेण्याच्या दृष्टीने यंदा खूप काळजी घेतली जात आहे.

हेही वाचा: Nandurbar : अष्टविनायक यात्रा बससेवा आता 20 सप्टेंबरला

Web Title: Lumpy Disease Effect On Pitrupaksha Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..