Kumbh Mela : सिंहस्थ कामांचा शंखनाद; शहरात 60 किलोमीटरचा बाह्य रिंगरोड

NMC latest News
NMC latest Newsesakal

नाशिक : मागील सिंहस्थात नव्वद किलोमीटरचा अंतर्गत रिंगरोड विकसित केल्यानंतर पुढील सिंहस्थात साठ किलोमीटर बाह्य अर्थात आउटर रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

२०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी (ता. १४) आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. (Simhastha Kumbh Mela 2027 28 60 km outer ring road in city nmc preparations Nashik Latest Marathi News)

त्या वेळी सिंहस्थासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. सिंहस्थाठी भूसंपादनासह साठ किलोमीटरच्या बाह्य रिंगरोड प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांधकाम विभागाने पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करावा.

मिळकत विभागाने आवश्यक भूसंपादन, वैद्यकीय व आरोग्य विभागाने सेवा पुरविण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. गर्दीचे नियोजन करण्यासाठी आयुक्त स्वतः गोदाघाटांची पाहणी करणार आहे.

रिंगरोडमुळे गर्दीचे नियोजन

२०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात अंतर्गत रिंगरोड विकसित करण्यात आला आहे. त्या रिंगरोडची गुणवत्ता अद्यापही सुस्थितीत असून टाकळी भागात रिंगरोडच्या चिंधड्या उडाल्या असल्या तरी त्याला तपोवन मार्गे वळविण्यात आलेली अवजड वाहतूक कारणीभूत आहे. या रिंगरोडमुळे सिडको, नाशिक रोड, पंचवटी व गंगापूर रोड भाग जोडला गेला.

अवघ्या तीस मिनिटात विनाअडथळा शहराच्या कुठल्याही भागात सहज पोचता येते. त्यामुळे रिंगरोडचे महत्त्व नाशिककरांना चांगलेच ठाऊक आहे. आता बाह्य रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शहरांच्या सीमेला लागून असलेल्या ग्रामीण भाग शहराच्या मध्यवर्ती भागाला जोडून वाहतूक सहजसोपी होणार आहे.

तत्कालीन शहर अभियंता सुनील खुने यांनी नव्वद किलोमीटर रिंगरोडवर लक्ष केंद्रित करत विकसित केला होता. त्या वेळी भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या गाठी-भेटी घेऊन त्यांना योग्य मोबदला देण्याबरोबरच त्यांची समजूत काढून शहर विकासाचे महत्त्व पटवून दिले होते.

आता पुढील सिंहस्थात बाह्य रिगरोडचे काम हाती घेतले जाणार असल्याने शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. बाह्य रिंगरोड काही भागात विकसित झाला आहे. परंतु, काही भागात भूसंपादनामुळे रखडला आहे. भूसंपादन झालेल्या भागात साठ मीटर रस्त्याची रुंदी वाढविली जाणार आहे.

NMC latest News
Fake Medical Certificate Case : खासगी रुग्णालयाची होणार चौकशी

विकसित झालेला अंतर्गत रिंगरोड

- टाकळी रोड

- वडाळा गाव

- पाथर्डी गाव चौफुली

- पाथर्डी फाटा

- गरवारे पॉइंट

- एक्सलो पॉइंट

- पपया नर्सरी

- बारदान फाटा

- गंगापूर गाव मार्गे पुन्हा गंगापूर नाका

- चोपडा लॉन्स मार्गे, मखमलाबाद

- तारवाला नगर, गुंजाळबाबा नगर

- विडी कामगारनगर मार्गे टाकळी गाव

प्रस्तावित बाह्य रिंगरोड

- नांदूर नाका ते जत्रा हॉटेल लिंक रोड

- सातपूर-अंबड लिंक रोड

- गंगापूर- सातपूर लिंक रोड

- बिटको- विहीतगाव-देवळाली रोड

"सिंहस्थानिमित्त बाह्य रिंगरोड विकसित केला जाणार आहे. बाह्य रिंगरोडमुळे शहरात ग्रामीण भागातून येणारी वाहतुकीचे नियोजन करणे शक्य होईल. त्याचबरोबर पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या."

- डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार,आयुक्त, महापालिका.

NMC latest News
अधिकाऱ्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर; अतिरिक्त आयुक्तांच्या लेटर बॉम्बने खळबळ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com