Maghi Ganesh Jayanti : माघी गणेश जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

On the occasion of Maghi Ganesh Jayanti, devotees gather at the Ganpati temple here for darshan.
On the occasion of Maghi Ganesh Jayanti, devotees gather at the Ganpati temple here for darshan.esakal

नाशिक : माघी गणेश जयंतीचे औचित्य साधत बुधवारी (ता. २५) शहरातील सर्वच लहान-मोठी गणेश मंदिरे गर्दीने फुलून गेली होती. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहरापासून चार किलोमीटर दूर असलेल्या गोदाकाठावरील निसर्गरम्य नवश्‍या गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. (Maghi Ganesh Jayanti Devotees line up for darshan on occasion nashik news)

गंगाघाटावरील प्राचीन मोदकेश्‍वर, भद्रकाली येथील साक्षी गणेश, रविवार कारंजावरील चांदीचा गणपती, आनंदवली येथील नवश्‍या गणपती, उपनगर येथील इच्छामणी, गणेशवाडी येथील तिळेश्‍वर यांसह शहर परिसरातील सर्वच लहान-मोठ्या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती.

यानिमित्त अनेक ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या सर्वच ठिकाणी रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. गंगाघाटावर प्राचीन मोदकेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. याठिकाणीही दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारातील नवश्‍या गणपतीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी दर्शनरांगा दूरवर पोचल्या होत्या. पहाटे चारला अभिषेक, काकड आरती झाल्यावर पालखी सोहळा पार पडला.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

On the occasion of Maghi Ganesh Jayanti, devotees gather at the Ganpati temple here for darshan.
Nashik NMC News : अवैध मिळकतींची आजपासून शोधमोहिम

सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत श्री गणेशयागाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बाराला भाविकांच्या प्रचंड उत्साहात श्री गणेश जन्मोत्सव पार पडला. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी होती.

पंचवटीत उत्साह

पंचवटी परिसरातील गणेशवाडी येथील तिळेश्‍वर गणपती मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. याशिवाय अमृतधाम परिसरातील त्रिमूर्ती दत्त पोलिस अधिकारी वसाहतीतील शिवशक्ती गणेश मंदिरात सकाळी अभिषेक झाल्यावर दुपारी गणेश जन्म व यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भजनसंध्या पार पडली.

On the occasion of Maghi Ganesh Jayanti, devotees gather at the Ganpati temple here for darshan.
नारोशंकराची घंटा : मग काय विरोधकांची झाली टाय टाय फिश!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com