Ram Lalla Pran Pratishtha : भव्य रांगोळीने वेधले नाशिककरांचे लक्ष; 25 हजार दिव्यांनी उजळला गोदाघाट

पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अयोध्येत भव्य राममंदिर साकारले आहे.
ABVP members and citizens celebrating Deepotsav on the bank of Godavari river.
ABVP members and citizens celebrating Deepotsav on the bank of Godavari river.esakal

Ram Lalla Pran Pratishtha : पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अयोध्येत भव्य राममंदिर साकारले आहे.

या मंदिरातील श्रीरामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (ता.२२) अयोध्येत प्रचंड उत्साहात पार पडला. (magnificent rangoli attracted attention of Nashikkar nashik news)

यानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गोदाघाटावर २५ हजार दिव्यांसह रामधून, महारांगोळी, रामखिचडी वाटप अशा उपक्रमांचे आयोजन केले होते. रामतीर्थापासून नारोशंकर मंदिरापर्यंत लावलेल्या या दीपोत्सवाने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त गंगाघाटावर अभाविपतर्फे सायंकाळी २५ हजार दिव्यांचा दीपोत्सव झाला. यासाठी अभाविपतर्फे प्रत्येकाला पाच दिवे घरून आणण्याचे आवाहन केले होते. पंचवटी परिसरामध्ये प्रभू रामचंद्रांचे दीर्घकाळ वास्तव्य असल्याने हा सोहळा प्रती अयोध्या मानल्या जाणाऱ्या नाशिक शहरवासीयांसाठीही मोठ्या अभिमानाचा व गौरवाचा आहे.

ABVP members and citizens celebrating Deepotsav on the bank of Godavari river.
Ram Lalla Pran Pratishtha : येवल्यात कारसेवकांचा गौरव; रामभजन संध्येत रामभक्त मंत्रमुग्ध

म्हणूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगरकडून हा उत्सव शहरातील गोदा घाट येथे आयोजित केला होता. यावेळी उपस्थित राम भक्तांनी राम खिचडीचा आस्वाद घेतला. सायंकाळी जुन्या भाजी बाजाराच्या जागेवर आयोजित रामधून या सांस्कृतिक कार्यक्रमातून कथक, भरत नाट्यम आदींचे सादरीकरण केले.

आजही रांगोळी पाहण्याची संधी

अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी १०८ बाय पन्नास फुटांच्या भव्य रांगोळीद्वारे नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. चित्रकला व ललित कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या महारांगोळीद्वारे श्रीरामप्रभू, सीतामाई प्रभू रामास दाखवत असलेले सुवर्णमृग व अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले.

यासाठी सर्व रंगांच्या एक हजार किलो रांगोळीचा वापर केला. नाशिककरांना ही महारांगोळी मंगळवार (ता.२३) सायंकाळपर्यंत पाहता येणार आहे.

ABVP members and citizens celebrating Deepotsav on the bank of Godavari river.
Ram Lalla Pran Pratishtha : ‘दगडू तेली’ वैभवशाली वनस्पती विज्ञानाचा वसा; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रभू श्रीरामचरणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com