Nashik News : ‘इन्सिनेटर’ मध्ये मागुर मासा नष्ट करणार; NMCने मत्स्य विभागाला दिली परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Magur Fish

Nashik News : ‘इन्सिनेटर’ मध्ये मागुर मासा नष्ट करणार; NMCने मत्स्य विभागाला दिली परवानगी

नाशिक रोड : मानवी आरोग्याला हाती घातक मागुर मासा विकताना अथवा उत्पादन घेताना दिसल्यास मत्स्य व्यवसाय विभाग महापालिकेच्या इन्सिनेटर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक करंट विल्हेवाट मशिनमध्ये नष्ट करणार आहे.

यासंबंधी नाशिक महापालिकेने परवानगी दिली आहे. संशोधन आणि विकास या तत्त्वावर महाराष्ट्रात नाशिक महापालिका परवानगी देणारी पहिलीच महापालिका आहे. (Magur fish will destroy in Incinerator NMC gave permission to Fisheries Department Nashik News)

देशी मागुर, बाई मागुर, आफ्रिकन मागुर या माशांचे मत्स्यसंवर्धन करणे, वाहतूक व विक्री करण्यास बंदी आहे. सध्या नाशिक विभागामध्ये येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांमध्ये मागुर मासा निर्मिती व विक्री वर मत्स्य व्यवसाय विभाग बारकाईने नजर ठेवून आहे.

नाशिक महापालिकेच्या चाळीस किलोमीटर परिघात मागुर मासा आढळून कारवाई केल्यास नाशिक महापालिकेच्या इन्सिनेटरमध्ये या माशाची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने नाशिक महापालिकेला यासंबंधी पत्र दिले होते. यावर नाशिक महापालिकेने तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik News : नाशिक रोडला 2 गटातील वादातून रेल्वे आरक्षण केंद्रावर दगडफेक

महाराष्ट्रात ही पहिलीच महानगरपालिका असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त संजय वाटेगावकर यांनी सांगितले आहे. कारवाई केलेले माश्यांचा महापालिकेच्या खत प्रकल्पात असलेल्या इन्सिनेटरमध्ये नष्ट करण्यात येणार आहे.

"सध्या मागुर मासा उत्पादन आणि विक्रीवर आम्ही कारवाई करीत आहोत. महापालिका क्षेत्रात हे मासे विल्हेवाट लावायचे असल्यास महापालिकेने परवानगी दिलेली आहे. महापालिकेच्या इन्सिनेटरमध्ये या माशांची विल्हेवाट लावण्यात येईल. यामुळे पकडलेले मागुर मासे खड्डा करणे, पुरणे ही श्रमाचे व कष्टाचे कामे वाचणार आहेत."

- संजय वाटेगावकर, मत्स्य उपायुक्त, नाशिक विभाग

हेही वाचा: Nashik News : NMC प्रशासनाचा थकबाकीदारांना नळजोडणी खंडीत करण्याचा इशारा

टॅग्स :NashiknmcFisheries