मेहबुबनगरमधील खुनातील संशयिताला 9 वर्षांनी अटक | Latest Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Latest crime News

मेहबुबनगरमधील खुनातील संशयिताला 9 वर्षांनी अटक

नाशिक : वडाळागावातील मेहबूबनगरमध्ये ९ वर्षांपूर्वी एकाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणातील संशयिताला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे. (Mahabubnagar murder suspect arrested after 9 years Nashik Latest Crime News)

मंगरू उर्फ अब्दुल मन्नान चौधरी (मूळ रा. रामपूर, सादुल्ला नगर, बलरामपुर, उत्तर प्रदेश. सध्या रा. घनसोली, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मार्च 2013 रोजी वडाळ्यातील मेहबूबनगर येथे संशयितासह साथीदारांनी सलाम नावाच्या व्यक्तीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर, त्याच्या रूमला बाहेरून कुलूप लावून पलायन केले होते.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याच्या तपासात मंगरू उर्फ अब्दुलचे नाव निष्पन्न झाले होते. तेव्हापासून फरार होता. पोलीस त्याचा शोध घेऊनही तो सापडत नव्हता.

हेही वाचा: Crime Update : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; संशयिताला अटक

दरम्यान, मंगळवारी (ता.2) युनिट दोनचे हवालदार चंद्रकांत गवळी यांना मंगरु हा मुंबईत राहत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त संजय बारकुंड, सहायक आयुक्त वसंत मोरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार नंदू नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, गुलाब सोनार, अंमलदार राहुल पालखेडे यांचे पथक संशयिताला अटक करण्यासाठी मुंबईला रवाना झाले.

त्यानंतर पथकाने नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घनसोली परिसरातून ९ वर्षांपासून पसार असलेला संशयित मंगरू यास अटक केली. संशयिताला इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा: Fraud Crime : कंपनी मालकानेच केली कामगारांची कोटीची फसवणूक

Web Title: Mahabubnagar Murder Suspect Arrested After 9 Years Nashik Latest Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..