SIR final voter list date Maharashtra
esakal
नाशिक : राज्यातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमामुळे (एसआयआर) ग्रामपंचायत निवडणुकांना विलंब होणार आहे. एसआयआरअंतर्गत ४ नोव्हेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार असल्याने दिवाळीनंतर, नोव्हेंबरअखेर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून, गावांना नवे कारभारी मिळण्यासाठी नव्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.