नाशिक- आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करीत आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ३०० जादा बस उपलब्ध केल्या आहेत. २ ते ११ जुलैदरम्यान जिल्ह्यातील १४ केंद्रांवरून पंढरपूरसाठी या बस सुटतील.