Onion
sakal
देवळा: एकीकडे चाळीतील कांदा खराब झाल्याचे नुकसान अन् दुसरीकडे कांद्याला उत्पादन खर्चाइतकाही भाव मिळत नसल्याने कांदाभावाचा नेहमीप्रमाणेच झालेला वांधा यामुळे शेतकरी वर्गाच्या तीव्र असंतोषातून आंदोलनांचे भडके उडू लागले आहेत. देवळा, सटाणा, उमराणे, लासलगाव, नामपूर, कापशी, एरंडगाव, सावतावाडी व इतर अनेक ठिकाणी सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको व आंदोलने, मोफत कांदावाटप, ग्रामसभांमध्ये अनुदानाचे ठराव, नाफेडचे ट्रक अडवणे अशा पद्धतीने असंतोष व्यक्त होत आहे.