नामपूर- महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ठोस पावले उचलली आहेत. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्लीत भेट घेऊन शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्यास कांद्याच्या दरपतनाने त्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती युवानेते डॉ. दीकपाल गिरासे यांनी दिली.