Political News : शिंदे गटाकडून ठाकरे गटाला शुभेच्छा

Maharashtra Political News
Maharashtra Political Newsesakal

नाशिक : शिवसेनेच्या आमदारांमध्ये फूट पडून राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट राज्यातील राजकारणात संपूर्ण ताकदीने उतरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीनिमित्त साधन नाशिकमध्ये शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा देत चाचपण्याचा प्रयत्न केला. जुन्या मैत्रीनिमित्त संपर्क झाला असल्याचे सांगितले जात असले, तरी यामागे मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. (Maharashtra Political News Best wishes from Shinde group to Thackeray group in election time Nashik News)

जून महिन्यात महाविकास आघाडीतील शिवसेना या प्रमुख पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४० आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत भाजपच्या मदतीने राज्यात सत्तांतर घडवून आणले. आता पक्ष चिन्हांवरून शिंदे गट व ठाकरे गटात न्यायालयीन लढाई सुरू आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने तूर्त मार्ग काढला असला, तरी धनुष्यबाणासाठी दोन्ही गटांमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे.

एकीकडे चिन्हासाठी लढत सुरू असताना, दुसरीकडे मात्र दोन्ही गट बळकट होण्यासाठी स्थानिक पातळीवर लढताना दिसत आहेत. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात ओढण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्याचा प्रत्यय नाशिकमध्ये दिवाळीनिमित्त दिसतोय.

Maharashtra Political News
Success Story: मंदिराच्या सेवक जाधव भगिनी बनल्या महिलांच्या प्रेरणास्थान

कसोटी दोन्ही गटांची

शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर नाशिकमधून पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे व खासदार हेमंत गोडसे यांच्याव्यतिरिक्त दुसरा असा सक्षम नेता गटात आलेला नाही. सध्या शिंदे गटाची जी रचना दिसते त्यात समाविष्ट झालेले पदाधिकारी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील दुसऱ्या फळीतील पदाधिकारी होते. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिंदे गटाने कंबर कसली असून, गट भक्कम करण्यासाठी पहिला वार शिवसेनेवरच घालण्यास सुरवात केली आहे.

दीपावली शुभेच्छांचे निमित्त साधून माजी नगरसेवकांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात समाविष्ट होण्याची गळ घातली जात आहे. राज्यात सत्ता आहे. भविष्यात संघटनेसह निवडणूक निवडून येण्याची संधी असल्याचे सांगून संघटनेतील पदांसंदर्भात आश्वासित केले जात आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची कसोटी आहे, तर दुसरीकडे दिवाळी शुभेच्छांचा प्रयोग यशस्वी झाल्यास शिंदे गटाच्या विस्तारवादी भूमिकेलाही मर्यादा येणार आहे.

Maharashtra Political News
Diwali Shopping : यंदाचा दिवाळी सण दणक्यात; वाहनबाजार, होमअप्लायन्सेस, ज्वेलरीत बूम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com