इगतपुरी- नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा आजपासून सुरू झाल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शालेय शिक्षण विभागाकडून तातडीने नव्या आदेशाची अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार दिवसभरात विद्यार्थ्यांची तीन वेळा हजेरी घेतली जाईल. गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तत्काळ ‘एसएमएस’ पाठविण्यात येणार आहे.