

Manikrao Kokate case
esakal
१९९६ पासून सुरू असलेल्या एका जुन्या खटल्यात अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, राज्याचे क्रिडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोर्टाने कलम ४१८ सीआरपीसी अंतर्गत ही कारवाई पूर्ण केली असून, मंत्री कोकाटे यांना तात्काळ पोलिसांसमोर हजर राहण्याचे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे.