esakal | SSC Result 2021 : नाशिक विभागात दहावीचा ऐतिहासिक 99.96 टक्‍के निकाल
sakal

बोलून बातमी शोधा

ssc result

SSC Result 2021 : नाशिक विभागाचा निकाल 99.96 टक्‍के

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : इयत्ता दहावीचा बहुप्रतिक्षित निकाल शुक्रवारी (ता.१६) ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे. दहावीचा नाशिक विभागाचा निकाल ऐतिहासिक ठरला आहे. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबारचा समावेश असलेल्‍या नाशिक विभागाचा निकाल ९९.९६ टक्‍के लागला आहे. मुले व मुलींच्‍या उत्तीर्णाचे प्रमाण प्रत्‍येकी ९९.९६ असेच आहे. विभागात नंदुरबारचा सर्वाधिक ९९.९९ टक्‍के तर धुळ्यातील ९९.९८ टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (maharashtra-state-board-nashik-division-ssc-result-2021-educational-marathi-news)

शासनाने ठरवून दिलेल्‍या सूत्रानुसार लागला निकाल

कोरोना महामारीमुळे (Corona virus) यंदा इयत्ता दहावीची लेखी परीक्षा होऊ शकली नव्‍हती. त्यामुळे इयत्ता नववीतील कामगिरी व अंतर्गत मुल्‍यमापनासंदर्भात शासनाने ठरवून दिलेल्‍या सूत्रानुसार दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

नाशिक विभागात दोन लाख १५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी दोन लाख ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ६२ विद्यार्थ्यांचे निकाल तांत्रिक त्रृटीमुळे प्रलंबित आहेत. त्यात काही विद्यार्थी अनुत्तीर्ण असू शकतात.

(maharashtra-state-board-nashik-division-ssc-result-2021-educational-marathi-news)

हेही वाचा: SSC Result 2021: कोकणची पोर हुशारच; यंदाही मारली बाजी

हेही वाचा: SSC Results : यंदाही मुलींचीच बाजी

loading image