Rupali Chakankar: अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! महिला आयोगाने सुमोटो अॅक्शन घेतली होती; पत्रात रुपाली चाकणकरांनी काय लिहिलंय?

Rupali Chakankar resignation: आरोपी अशोक खरातचे ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे.
Rupali Chakankar

Rupali Chakankar

ESakal

Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकस्थित ढोंगी बाबा अशोक खरात याचा पर्दाफाश झाल्यानंतर आणि त्याच्याशी असलेल्या रूपालींच्या जवळच्या संबंधांचा खुलासा झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत होती. अशोक खरातचे अनेक राजकारण्यांसोबतचे फोटो समोर आले. त्याचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओदेखील सापडले आहेत. अशोक खरात याच्याशी संबंधित बलात्कार प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com