

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक आयोगाकडं फेर मतमोजणी करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. अनेक बूथवर मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळं या फेरमोजणीसाठी आवश्यक असलेली फी भरण्यासही बडगुजर यांनी तयारी दर्शवली आहे. त्यामुळं इथं फेर मतमोजणी होण्याची शक्यता आहे.