.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला त्यानंतर आज २७ तारीख उजाडली आहे. म्हणजेच निकाल लागून चार दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापन झालेलं नसल्यानं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुतीला सवाल केला आहे. इतका उशीर का होतोय, कशासाठी प्रयत्न सुरु आहेत? असं पटोले यांनी विचारलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.