नाशिक- राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, महिलांना संरक्षण देण्यात महिला आयोग अपयशी ठरला आहे. ही कुठल्याही राजकीय पक्षाची शाखा नाही. आयोगात अराजकीय व्यक्ती नेमल्यास त्यांच्यावर दबाव येणार नाही. आगामी अधिवेशनात याबाबत मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी (ता. २४) येथे सांगितले.