Nashik News : अमेरिकेत महिलांनी धरला फेर, झिम्मा अन् खेळांचा रंगतदार दंगा

Maharashtrian women playing Zimma on the occasion of Mangalagaur
Maharashtrian women playing Zimma on the occasion of Mangalagauresakal

Nashik News : श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन्ह पडे

हसरा, नाचरा श्रावण आला, की आपसूकच मन बालकवींच्या कवितेच्या या ओळी गुणगुणायला लागतं. श्रावणात येणारे सण, उपवास, घरामधले प्रसन्न वातावरण, उत्साह या सर्व गोष्टींची आठवण येते. उत्साह आणि आनंद यांची सांगड घालणारा, नव्या नवरीचा श्रावणात साजरा करण्यात येणारा एक सण म्हणजे मंगळागौर. (maharashtrian women celebrate mangalagaur in america nashik news)

श्रावणातील बालपणीच्या आठवणी त्यात प्रसारमाध्यमे, व्हॉट्सॲप वगैरे वरचे मंगळागौरी पूजन आणि खेळाचे संदेश, व्हिडिओ बघून मराठमोळे मन, मराठमोळ्या संस्कृती आणि परंपरेकडे आणखीच धाव घेते आणि झालेही तसेच अमेरिकेतील अटलांटा येथील शहरात.

नऊवारी साडी, नाकात नथ, दागदागिने आणि श्रावण महिन्यात मंगळगौरीची थाट हे दृश्य तसं अगदी सर्वसामान्य आपल्या पाहण्यातील आहे, पण आजची मंगळागौर ही खास आहे. कारण ती झालीय महाराष्ट्रातून थेट अमेरिकेत.

होय परदेशी राहून आपली भारतीय संस्कृती जपणाऱ्या मऱ्हाटमोळ्या ऐश्वर्या महाले, राजश्री खर्जुल, अनिशा अंकुश, सयुरी कुलकर्णी, ऐश्वर्या कटाले, तृप्ती जाधव अमेरिकेतील अटलांटा शहरात स्थायिक झाल्या. लग्नाच्या साधारण दोन- तीन वर्षांनी परदेशी राहून आपल्या मंगळगौरीच्या सणाचे उद्यापन केले आहे. ऐश्वर्या महाले परदेशी राहूनही आपली भारतीय संस्कृती सण-सोहळे मुळीच विसरलेली नाही.

ऐश्वर्या व त्यांच्या सख्यांनी जागा उपलब्ध करत असलेल्या साहित्यात पूजा पूर्ण केली. गणेशस्तवनाने मंगळागौरीच्या खेळाला सुरवात झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Maharashtrian women playing Zimma on the occasion of Mangalagaur
Nashik ZP News : अखर्चिक निधी परत न केल्याने जिल्हा परिषदेची देयके रोखली; कर्मचाऱ्यांच्या वेतनाला बसला फटका

मग फेरा घेत या सर्व महिलांनी फेर, ताकाचा डेरा, झुकु लुकू लुकू, सई बाईचा कोंबडा, आगोटा पागोटा, खडक झिम्मा, भोवर भिंडी, जावा जावाचं भांडण, दिंड्या, ढोम्य ऋषींचा झिम्मा, तिखट मीठ मसाला, गोफ, चढू बाई चढू, सोमू गोमू, झिम्मा, काच किरडा, लाट्या, होडी, पिंगा, सुपारी, अडवळ घूम, पाणी लाटा, तवा कमळ, गाठोडं, घोडा, असे एकापेक्षा एक मंगळागौरीचे खेळ सादर करत अमेरिकेच्या मंगळागौरीला चार चांद लावले. या मंगळागौरीच्या खेळात ऐश्वर्या महाले, राजश्री खर्जुल, अनिशा अंकुश, सयुरी कुलकर्णी, ऐश्वर्या कटाले तृप्ती जाधव या सर्व सखी सहभागी झाल्या होत्या.

"मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि श्रमाचे नसून चपलता देणारे, चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे, असे म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा आज अमेरिकास्थित असलेल्या जपत आहेत, याचे कौतुक वाटते. अशा संस्कृती रक्षकांमुळेच आज परदेशात भारतीय संस्कृतीचा आदर केला जातो." -सुवर्णा क्षीरसागर, नाशिक

"मंगळागौर खेळतांना एकमेकींना सांभाळत,शिकवत आपण आपल्या मातीशी,संस्कृतीशी किती जोडलेलो आहेत हे दाखवून गेला,अन त्याच बरोबर आपापल्या व्यापातून काही क्षण आनंदाचा देऊन गेला." -ऐश्वर्या महाले, अटलांटा, अमेरिका

Maharashtrian women playing Zimma on the occasion of Mangalagaur
Ganeshotsav 2023 : राममंदिर, ‘कांतारा’ची गणेशोत्सवावर छाप; नागरिकांना भुरळ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com