नाशिक : ‘मल्टी मोडल हब’ बाबत महारेलचे वेट ॲन्ड वॉच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik metro hub
नाशिक : ‘मल्टी मोडल हब’ बाबत महारेलचे वेट ॲन्ड वॉच

नाशिक : ‘मल्टी मोडल हब’ बाबत महारेलचे वेट ॲन्ड वॉच

नाशिक : शहर बससेवेसाठी सिन्नर फाटा येथे डेपो उभारणीच्या जागेवर नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे लाइनची अलायमेंट याच जागेतून जात असल्याने बस डेपो किंवा अलायमेंट हलविण्याऐवजी शहर बस, महारेल व मेट्रो निओ या तीनही कंपन्यांकडून या जागेवर मल्टी मोडल ट्रान्स्पोर्ट हब(multi modal transport hub) तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेने (nashik carporation)राज्य शासनासमोर ठेवला असला तरी महारेलकडून मात्र प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे हा प्रकल्प गुंडाळला जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा: शाळकरी मुलं तरी 'ते' लिहितात दोन्‍ही हातांनी, म्हणतात ८११ पर्यंतचे पाढे; पाहा व्हिडिओ

सिन्नर फाटा येथे महापालिकेचा आरक्षित भूखंड आहे. सदरचा भूखंड रेल्वेला देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. परंतु २०१७ च्या विकास आराखड्यात पब्लिक ॲमेनिटीसाठी आरक्षण पडल्याने महापालिकेने शहर बस डेपो उभारण्याचा निर्णय घेतला. सुमारे अकरा एकर जागेवर बस डेपो उभारण्याचे काम सुरू असतानाच नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी भूसंपादन होत असल्याने डेपोच्या जागेवरून रेल्वे लाइनची अलायमेंट जात आहे. सदरची जागा महारेलकडे हस्तांतरित करण्याची मागणी झाल्यानंतर महापालिका व महारेल कंपनीचे नुकसान होण्याऐवजी महारेल कंपनीने ८० मीटरऐवजी अतिरिक्त जागा संपादित करून त्या जागेवर मल्टी मोडल ट्रान्स्पोर्ट हबचा प्रस्ताव महारेल कंपनीकडे महापालिकेने दिला.

हेही वाचा: 'पूल बांधला हो, पण पाण्याची वणवण संपणार कधी?' आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

मेट्रो निओ प्रकल्पदेखील (nashik metro project)याच भागातून जाणार असल्याने नाशिककरांना एकाच वेळी रेल्वे, शहर बस व टायरबेस मेट्रो एकाच इमारतीमध्ये उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तीन मजली इमारत उभारून तेथे मल्टी मोडल ट्रान्स्पोर्ट हब निर्माण करण्याचा प्रस्ताव महारेलसह महामेट्रो कंपनी समोर ठेवण्यात आला. महारेल कंपनीने चाळीस एकर जागेवर हब उभारण्याचे प्राथमिक स्वरूपात मान्य करताना अतिरिक्त जागा संपादन करण्याचेदेखील मान्य केले. परंतु अद्याप कुठलाच पत्रव्यवहार केला नाही. मल्टीमोडल हबचा प्रस्ताव राज्याच्या अर्थमंत्रालयासमोर सादर करण्यात आला त्यात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सुधारणा झाल्या त्याप्रमाणे महारेलशी संपर्क साधला, परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळतं नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: महानगरपालिकेला चपराक; दावा चालविण्याचा स्थानिक न्यायालयास अधिकार

ट्रान्स्पोर्ट हबमध्ये महत्त्वाचे

  1. महापालिका, महारेल व मेट्रो निओचा स्वतंत्र खर्च वाचणार.

  2. एकाच इमारतीमध्ये तीन प्रकारच्या ट्रान्स्पोर्ट सुविधा.

  3. प्रत्येक मजल्यावर सरकते जिने.

  4. पहिल्या मजल्यावर रेल्वे, दुसऱ्या मजल्यावर बस, तर तिसऱ्या मजल्यावर मेट्रो.

  5. ट्रान्स्पोर्ट हबच्या इमारतीमध्ये कमर्शिअल मॉल, थिएटर, ऑफिसेस, कार पार्किंगची सुविधा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top