महाविकास आघाडीतर्फे प्रत्येक आमदारांसाठी 5 कोटींचा निधी

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadiesakal

नाशिक : शिवसेनेतील (Shiv sena) बंडखोरीच्या पार्श्‍वभूमीवर आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) नियोजन विभागातर्फे आमदारांसाठी प्रत्येकी पाच कोटींचा विकास निधी यंदापासून देण्याचा निर्णय घेतला. विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींची वाढ करण्यात आली आहे. (Mahavikas Aghadi provides Rs 5 crore for each MLA Nashik Political News)

Mahavikas Aghadi
शहरात दुचाक्या चोरट्यांचा सुळसुळाट; वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघासाठी एक कोटींचा निधी वाढवण्याचे आश्‍वासन दिले होते. दरम्यान, २०२१-२२ पासून प्रत्येक आमदारांना चार कोटींचा विकास निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. स्थानिक विकास कार्यक्रमातंर्गत यंदापासूनच्या पाच कोटींमधून स्थानिक लोकांच्या गरजेनुसार उपयुक्त आणि सहज पूर्ण होणारी छोटी कामे घेता येतील, असे नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच यंदापासून उपलब्ध होणाऱ्या निधीपैकी १० टक्के निधी आमदारांना स्थानिक विकासतंर्गत आणि अन्य सरकारी कार्यक्रम तथा योजनांमध्ये बांधण्यात आलेल्या वास्तू तथा मालमत्ता देखभाल व दुरुस्तीसाठी उपलब्ध करुन देता येईल.

Mahavikas Aghadi
Nashik : महापालिकेचे स्वतःच्याच धोकादायक इमारतीकडे दुर्लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com