
‘महाविकास’चा झेंडा;नाशिक जिल्ह्यात सरशी
नाशिक : नगरपंचायतीच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीची(mahavikas aghadi) सरशी झाली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या सुरगाणा आणि दिंडोरीमध्ये त्रिशंकू स्थिती तयार झाली आहे. शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-शहर विकास आघाडीने निफाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या गटाला धोबीपछाड दिली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार(central state minister dr bharati pawar) आणि त्यांचे थोरले दीर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीत दिराने बाजी मारत महाविकास आघाडीला सत्ता मिळवून दिली. भारतीय जनता पक्षाचे(bjp) जिल्हाध्यक्ष केदार आहेर यांनी देवळ्यातील सत्ता राखली.
हेही वाचा: वार्षिक राशिभविष्य | धनू - नावलौकिक मिळेल; प्रगती होईल
झिरवाळ यांच्या मुलाची कमाल
विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातील पेठ नगरपंचायतीमध्ये झिरवाळ यांचा मुलगा गोकूळ झिरवाळ यांनी नेतृत्व करत ‘राष्ट्रवादी’ला १७ पैकी ८ जागा मिळवून दिल्या आहेत. पेठमधील सत्तेचे किंगमेकर जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे सदस्य भास्कर गावित यांना ४ जागांवर समाधान मानावे लागले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ३, अपक्ष आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठमध्ये पाच उमेदवारांपैकी एकालाही खाते उघडता आले नाही. अपक्षांच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेस पेठमध्ये सत्ता मिळवण्याची शक्यता अधिक आहे.
हेही वाचा: वार्षिक राशिभविष्य | मिथुन - मानसन्मान वाढेल; भरभराटही होईल
निफाडमध्ये शिवसेनेला यश
जिल्हावासियांचे निफाडच्या राजकीय समीकरणाकडे अधिक लक्ष असते. निफाडमध्ये १७ पैकी शिवसेना ७, शहरविकास आघाडी ४, काँग्रेसला १, बहुजन समाजवादी पार्टीला १ आणि अपक्ष १ असे आघाडीच्या राजकारणाचे बलाबल १४ पर्यंत पोचले. राष्ट्रवादीला ३ जागांवर समाधान मानावे लागले. १७ पैकी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक ८ जागा मिळाल्या आहेत.
दिंडोरीमध्ये काय होणार?
दिंडोरीमध्ये शिवसेनेला(shivsena) सर्वाधिक ६, राष्ट्रवादीला ५, भाजपला ४, काँग्रेसला २ जागांवर यश मिळाले. माजी आमदार रामदास चारोस्कर हे शिवसेनेची सूत्रे सांभाळत आहेत. त्यांना मानणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये सदस्य आहेत त्यामुळे त्यांच्या मदतीने शिवसेना सत्ता आपल्याकडे राखणार की महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi)राजकारणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला(ncp and congress) सोबत घेणार याबद्दलचे प्रश्नचिन्ह कायम आहे.
Web Title: Mahavikasaghadi Won In Nagar Panchayat Election At Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..