Dr. Apoorva Hiray
sakal
नाशिक: नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह संचालकांनी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या नावे बनावट कर्ज प्रकरणे केली आणि कर्जाची रक्कम स्वत:च्या लाभासाठी वापरून बँकेची, तसेच बँकेच्या सभासदांची तब्बल १७ कोटी ७४ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बँकेच्या अध्यक्षा योगिता अपूर्व हिरे, संचालक डॉ. अपूर्व हिरे यांच्यासह संचालकांविरोधात सरकारवाडा पोलिसांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले.