सातपूर: महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीने त्यांच्या नूतन प्रकल्पासाठी नाशिकला जागेची मागणी केली आहे. यासंदर्भात उद्योग विभाग सकारात्मक असून, जागासुद्धा निश्चित केली आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (ता. ११) ‘निमा’ सभागृहात झालेल्या संवाद बैठकीत केली. उद्योजकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या घोषणेचे जोरदार स्वागत केले. निधीअभावी नाशिक जिल्ह्यातील कोणताही प्रकल्प व सुख-सुविधा रखडणार नाही, असे अभिवचनही त्यांनी दिले.