esakal | महिंद्राने परत मागविली नाशिकच्या कारखान्यात तयार झालेली ६०० वाहने
sakal

बोलून बातमी शोधा

Mahindra company

महिंद्राने परत मागविली नाशिकमध्ये तयार झालेली ६०० वाहने

sakal_logo
By
सतिश निकुंभ

सातपूर (जि. नाशिक) : देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्र ॲन्ड महिंद्रने त्यांची तब्बल ६०० डिझेल वाहने परत मागविली (Recall) आहेत. संभाव्य त्रुटींमुळे ही वाहने मागविल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. नाशिकमधील कंपनीच्या कारखान्यात तयार केलेली काही मॉडेल्समध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा संशय आहे. त्यामुळेच कंपनीने वाहने रिकॉलचा निर्णय घेतला आहे. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. (Mahindra recalls of 600 vehicles manufactured at Nashik factory)

महिंद्र ॲन्ड महिंद्र यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कंपनीने आपल्या काही वाहनांमध्ये डिझेल इंजिनची तपासणी व बदली करण्यासाठी वाहने रिकॉलची घोषणा केली आहे. ही वाहने कंपनीच्या नाशिक कारखान्यात तयार केली जातात. डिझेल इंजिनमध्ये काही त्रुटी राहिल्याची कंपनीला शंका आहे. ही रिकॉल पूर्णपणे ऐच्छिक आहे. ग्राहकांशी ई-मेल, कॉल किंवा मेसेजद्वारे संपर्क साधला जाईल. डिलरद्वारे ही प्रक्रिया होईल. वाहन तपासणी किंवा कोणतीही ठरलेही पैसे घेतले जाणार नाहीत. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. तथापि, दोन रिकॉलमध्ये कोणत्या मॉडेलचा समावेश आहे, याबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. कंपनीच्या वाहन पोर्टफोलिओमध्ये अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. नाशिकच्या कारखान्यात स्कॉर्पिओ, मरॅझो, बोलेरो आदींचा समावेश आहे. त्यामुळे यातील नक्की कोणती वाहने रिकॉल करण्यात आली आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही.

(Mahindra recalls of 600 vehicles manufactured at Nashik factory)

हेही वाचा: नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात १४६ रुग्ण कोरोनामुक्‍त

loading image