esakal | नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात १४६ रुग्ण कोरोनामुक्‍त
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात १४६ रुग्ण कोरोनामुक्‍त

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होण्याच्‍या अनुषंगाने जुलै महिन्‍याचा उत्तरार्ध काहीसा दिलासादायक ठरत आहे. मंगळवारी (ता. २०) जिल्‍ह्यात ८० रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर १४६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. चार बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत साठने घट झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात एक हजार ४२३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (80 new corona positive patients reported in district)

जुलै महिन्‍यात दुसऱ्यांदा दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बधितांची संख्या शंभरपेक्षा कमी राहिली. यापूर्वी १२ जुलैला जिल्‍ह्यात ७६ पॉझिटिव्‍ह आढळले होते. मंगळवारी (ता. २०) नाशिक महापालिका क्षेत्रात ५३, नाशिक ग्रामीणमध्ये २१, तर जिल्‍हाबाहेरील सहा रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. मालेगाव महापालिका क्षेत्रात एकही नवीन बाधित आढळला नाही. जिल्‍ह्यातील चार मृतांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील तीन व नाशिक ग्रामीण क्षेत्रातील एका बाधिताचा समावेश आहे.

हेही वाचा: Redmi चा पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार २४४ अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीण क्षेत्रातील सर्वाधिक ७२० रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. नाशिक महापालिका क्षेत्रात २८२, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात २४२ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २८७ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील २५३ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीण क्षेत्रात २२, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील दहा रुग्‍णांचा समावेश आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये दिवाणी न्यायालयात ‘व्हर्च्युअल’ कामकाज

loading image