esakal | मोराच्या हत्याप्रकरणातील मुख्य संशयित ताब्यात; वनविभागाची सिनेस्टाईल कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

main suspect in  peacock murder case arrested

मोराच्या हत्याप्रकरणातील मालेगावचा मुख्य संशयित ताब्यात

sakal_logo
By
संजीव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : चार दिवसांपूर्वी भार्डी धनेर शिवारात राष्ट्रीय पक्षी मोराच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या मुख्य संशयिताला शुक्रवारी (ता. ८) ताब्यात घेण्यात अखेर वनविभागाला यश आले. न्यायालयाने त्याला चार दिवसाची वन कोठडी सुनावली असून, याप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे.

वनविभागाची सिनेस्टाईल कारवाई

मालेगाव शहरातील रजा चौक या ठिकाणी सापळा रचून सिनेस्टाईल पाठलाग करुन सराईत संशयित आरोपी अशपाक अंजुम महम्मद अनवर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये वन्यप्राण्यांची/पक्षांची शिकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. डी. कासार तपास करीत आहे. या कारवाईमध्ये वनपाल ए. ई. सोनवणे, एम. एम. राठोड, टी. ई. भुजबळ, डी. एफ. वडगे, वनरक्षक एम. बी. पाटील, पी. आर. पाटील, आर. के. दोंड, ए. एम. वाघ, एन. के. राठोड, एस. बी. शिरसाठ, सी. आर. मार्गेपाड, आर. बी. शिंदे, संजय बेडवाल, एम. ए. पाटील यांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा: पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरीजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार

हेही वाचा: कोरोनाच्या नावाखाली होऊ द्या खर्च!

loading image
go to top