शेतकऱ्याची क्रूर चेष्टाच! मका नोंदणी सात हजारांवर अन्‌ प्रत्यक्षात खरेदी मात्र तीन हजार?

maize sale.jpeg
maize sale.jpeg

नाशिक : रब्बी हंगामातील मक्याची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या मका आधारभूत किंमत खरेदी योजना २०१९-२० अंतर्गत नोंदणी केली. पुढे महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात दोन टप्प्यांत मका खरेदी केली. मात्र असे असताना ज्या शेतकऱ्यांनी शासनाच्या भरवशावर नोंदणी केली होती, मात्र अशा अनेक शेतकऱ्यांना 'ना फोन आला ना मका खरेदी झाली' अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. 

मका खरेदी न केल्याने शेतकऱ्यांची कोंडी

जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक शेतकरी नोंदणी करूनही मका विक्रीपासून वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील आठ केंद्रांवर बुधवार (ता. १५) अखेर ८८ हजार २८८ क्विंटल मका खरेदी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सरकारचा लक्ष्यांक पूर्ण झाला असला तरी अनेक शेतकऱ्यांना या योजनेतून न्याय मिळाला नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अनेकांना एक हजार ७६० रुपयांचा हमीभाव तर दूरच; मात्र त्यांची चिंता वाढली आहे. पहिल्या टप्प्यात २.५ लाख टन खरेदी झाल्यानंतर केंद्र शासनाने या योजनेंतर्गत मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देत नऊ लाख टन खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी दिली होती. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात २५ जूनपासून मका खरेदी सुरू होती. मात्र आता शेतकऱ्यांची मका खरेदी न केल्याने कोंडी झाली आहे. 

हमीभावाच्या भरवशावर विक्रीची अडचण

भरडधान्य मका खरेदीच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील ज्या मका उत्पादक शेतकऱ्यांची खरेदी झाली, असे अनेक घटक पेमेंटच्या प्रतीक्षेत आहेत. तर मात्र ज्यांनी मका विकण्यासाठी नोंदणी केली, अशा निम्म्या शेतकऱ्यांना या माध्यमातून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे विकून पैसे न मिळाल्याची अडचण, तर हमीभावाच्या भरवशावर विक्रीची अडचण, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

आकडे बोलतात... 

खरेदीची स्थिती 

शेतकरी नोंदणी... ७५८४ 

शेतकरी खरेदी...२७६६ 

खरेदीतील झालेले व्यवहार...३०५६ 

विक्रीवाचून वंचित शेतकरी...४५२८ 

तालुकानिहाय मका खरेदी : (१५ जुलैअखेर) 


तालुका...शेतकऱ्यांची नोंद...शेतकरी खरेदी...मका खरेदी (क्विंटल) 

सिन्नर...१,३४७...३०७...८,१६७ 

येवला...८५८...५२७...१५,९५१ 

चांदवड...६८८...४५९...१३,९४७ 

नांदगाव...१२७...५९...१,५६७ 

मालेगाव...१५०९...४८५...१५,३१३ 

सटाणा...१००४...३०६...८,०४५ 

देवळा...८७२...६००...९,०५१ 

लासलगाव...११७९...६०५...१६,२२६ 

निफाड...०...०...० 

मका खरेदीसाठी नोंदणी सुरू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीच नोंदणी केली. मात्र खरेदीसाठी निरोप नसल्याने चकरा मारल्या, असे सांगितले. मात्र मोबाईलवर ना मेसेज आला ना खरेदी केली. आमच्याकडे दुर्लक्ष झाल्याने आमचा वेळ व मेहनत वाया गेली. - दिगंबर निकम, मका उत्पादक, विठेवाडी (ता. देवळा) 

एकीकडे भांडवल नसल्याने कमी उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्यांनी मक्याचे पीक घेतले. त्यास अपेक्षित भाव नसल्याने हमीभाव मिळेल, या उद्देशाने शासनाच्या खरेदी योजनेत नोंदणी केली. मात्र जिल्ह्यातील निम्मे शेतकरी वंचित आहेत. शासनाने त्यांना विचारात घेऊन खरेदी पूर्ण करावी. 
- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com