Nashik News : पोलिस चालकाच्या प्रसंगावधानाने बस अग्निकांडाची मोठी दुर्घटना टळली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corporation bus with engine smoke at Suburban signal

Nashik News : पोलिस चालकाच्या प्रसंगावधानाने बस अग्निकांडाची मोठी दुर्घटना टळली!

नाशिक रोड : त्र्यंबकेश्वर येथून शिर्डीला जाणाऱ्या बसमधील (Bus) बॅटरीची वायर शॉर्टसर्किट झाल्याने अचानकपणे बसच्या काही भागातून धूर निघू लागला.

त्यानंतर सदरची बस पेट घेणार असे समजताच बस चालकाने तत्काळ बस थांबविली. (major bus fire accident was averted due to intervention of police driver nashik news)

प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांना खाली उतरविले. पाठीमागूनच शहर वाहतुकीचे पोलिस येत होते त्यांनीही तत्काळ मदत करून बस मधील प्रवाशांना उतरवले. त्यामुळे सुदैवाने बस अग्नीकांडसारखी दुर्घटना टळली.

त्र्यंबकेश्वरवरून शिर्डीकडे बस (एमएच १४ बीटी ४११७) जात होती. बस नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या उपनगर नाक्याजवळ येताच बसच्या बॅटरीमधील वायर तुटली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. बस चालकाने बस थांबविली तसेच, पाठीमागून शहर वाहतुकीचे पोलिस निरीक्षक दिनकर कदम हे सुद्धा आपल्या वाहनाने येत होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यांना बसमधून धूर निघत असल्याची घटना समजताच त्यांनी सहकाऱ्यांसमवेत बसमधील प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशनम कर्मचाऱ्यांनी बसवर पाण्याचा मारा करून बसची आग विझविली.

त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. याआधीही खासगी बस दुर्घटनेत काही महिन्यांपूर्वी हॉटेल मिरची जवळ दहा जण ठार झाले होते. तसेच, नाशिक पुणे महामार्गावर पळसे येथे महामंडळाच्या बसने पेट घेतला होता.

त्यात दोन दुचाकीचालक जळून ठार झाले होते. या दोन्ही घटना ताज्या असतानाच ही मोठी घटना टळली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.