मेजर नारायण मढवई अमर रहें!

शेतकरी कुटुंबातील व गावातील सैन्यात भरती झालेला पहिले तरुण म्हणजे नारायण मढवई

Major Narayan Madhavai amar rahe
Major Narayan Madhavai amar rahe sakal

चिंचोडी बुद्रुक (ता. येवला) येथील रहिवासी तथा वीरमरणप्राप्त मेजर नारायण मढवई यांचा शनिवारी (ता. १९) दशक्रिया विधी आहे. यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

शेतकरी कुटुंबातील व गावातील सैन्यात भरती झालेला पहिले तरुण म्हणजे नारायण मढवई होय. डिसेंबर २००२ मध्ये नारायण मढवई यांना सैन्यात सिलेक्शन झाल्याचे पत्र टपालाने आले. ३१ जानेवारी २००३ मध्ये नगरला प्रशिक्षणासाठी ते रवाना झाले.

ट्रेनिंग झाल्यानंतर बाडमेर (राजस्थान) येथे त्यांची पोस्टिंग झाली. जम्मूमधील बारामुल्ला (बंदिपुरा सेक्टर) भागात त्यांनी तीन वर्षे सेवा केली. नंतर अमृतसर (पंजाब), नगर, बबिना (झाशी) आणि सध्या ते हिसार (हरियाना) येथे सेवेत होते. मेजर नारायण मढवई ४२ आरमाडमध्ये रणगाडा चालक होते. १०१९ मध्ये मिलिटरीचा कार्यकाळ पूर्ण होऊन त्यांचे प्रमोशन झाले होते. ‘मेजर नारायण सर’, असे त्यांचे नाव होते. दीड वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असताना, गुरुवारचा दिवस (१० फेब्रुवारी) त्यांच्या आयुष्यात काळरात्र बनून आला. मेजर नारायण निवृत्ती मढवई कर्तव्य बजावून होम क्वॉटरकडे निघाले असताना, त्यांची गाडी व रणगाडा यांच्यात धडक झाली. यात त्यांना वीरमरण आले. त्याच दिवशी दुपारी बंधू बाळासाहेब यांच्याशी भाची कांचन हिचा साखरपुडा असल्याने व्हिडिओ कॉल झाला. नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेसहाला वडील निवृत्ती मढवई यांना कॉल करून तब्यतीची विचारपूसही झाली. मात्र, हा कॉल शेवटचा कॉल असेल, असे कोणालाही वाटले नव्हते. त्यांच्या अचानक जाण्याची बातमी समजताच युनिट ४२ रेजिमेंटमधील ६०० जवान निःशब्द झाले. गावी आल्यावर प्रत्येकाशी ‘जय हरी’ अशी विचारपूस करून भेट घेणारे सर्वांचे आवडते भूमिपुत्र नारायण मढवई होते. २६ जानेवारी, १५ ऑगस्टला न चुकता शाळा, एरंडगाव येथील महाविद्यालयाला शुभेच्छा देणारे भूमिपुत्र सामाजिक कार्यातही पुढे होते. चिचोंडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी असलेले मेजर नारायण मढवई यांनी २०१५ मध्ये शाळेला भेट दिली.

या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मनोगत व्यक्त केले. मीही आपण जसे शिकतात, तसेच मी याच शाळेत शिकलो आहे. याच पटांगणात खेळलो असल्याच्या व शाळेतील आठवणी शेअर केल्या. ज्या शाळेने मला घडविले. माझा शैक्षणिक पाया पक्का केला. त्या शाळेबद्दल मी कृतज्ञ आहे, असे म्हणत शाळेला स्वागत कमान बांधून देणार, असे म्हटले. सिमेंट व लोखंडी कमान (गेट) उभी करून आर्थिक मदत केली. घरी आल्यावर ते शेतात राबणार, कुटुंबाच्या सदस्यांना प्रत्येक कामात मदत करणार, पहाटे उठण्याची सवय असल्याने घरी आल्यावर लवकर उठून जनावरांचे शेण उचलून, झाडून घेणार, वैरण करणार, अशी कामे करताना कधीच मी मेजर असल्याचा आविर्भाव त्यांनी दाखविला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com