नाशिक- नायगाव (ता. सिन्नर) येथील युवा उद्योजक संतोष सांगळे यांनी फ्रँकफर्ट येथे झालेल्या महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरम (एमईबीएफ) या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांच्या स्टार्टअप ‘मेक इट ॲब्रॉड’चे प्रभावी सादरीकरण केले. ग्रामीण भारतातील परिचारिकांसाठी जर्मनीसारख्या देशांमध्ये थेट नोकरीच्या संधी निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला.