Kirit Somaiya
sakal
मालेगाव: हजार २७३ जन्मदाखले रद्द करण्यात आले. तसेच, जन्मदाखले काढलेले ५०० नागरिक शहरातून गायब झाले आहेत. २४ नागरिकांनी परदेशात पलायन केल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी येथे सांगितले. श्री. सोमय्या मंगळवारी (ता. १८) मालेगाव दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू व आयुक्त रवींद्र जाधव यांची अपर पोलिस अधीक्षक कार्यालयात बंद दारात चर्चा झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, की येथे महापालिकेने जन्मदाखले रद्द केले आहेत.