esakal | 'मालेगावचे पाणी शुद्ध, अफवांवर विश्वास ठेवू नका'
sakal

बोलून बातमी शोधा

Water-Supply

'मालेगावचे पाणी शुद्ध, अफवांवर विश्वास ठेवू नका'

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केले आहे.


शहरात पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत पाणीपुरवठा विभागाकडून मॉन्सून असल्याने विशेष दक्षता घेण्यात येत आहे. पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्रावर मुबलक प्रमाणात रसायनाचा साठा उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच आवश्यक पाण्याची गुणवत्ता तपासणी डीपीएचएल लॅब नाशिक यांच्या मार्फत दैनंदिन स्तरावर करून घेण्यात येत आहे. संबंधित संस्था ही पाणी पिण्यास योग्य अथवा अयोग्य असल्याबाबत नियमितपणे महापालिकेस अवगत करत असते. २३ ऑगस्टपर्यंत पाठविण्यात आलेल्या पाणी नमुने तपासणीपैकी सर्वच्या सर्व ११९ पाणी नमुने पिण्यास योग्य गुणवत्तेचे असल्याबाबत अहवाल महापालिकेस प्राप्त झालेले आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत पुरवठा करण्यात येणारे पाणी योग्य गुणवत्तेचे व पूर्णतः शुद्ध असल्याने पिण्यास योग्य आहे. नागरिकांनी निश्चित राहावे व कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही गोसावी यांनी कळविले आहे.

हेही वाचा: 'गवळींनी ट्रस्टची ७० कोटींची संंपत्ती पीएच्या नावावर केली'

loading image
go to top