Nitin Upasani
sakal
नाशिक: मालेगाव येथील शिक्षण संस्थेतील शिक्षक व लिपिकपदाच्या बोगस भरती प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. १६) दुपारी ताब्यात घेत अटक केली. शालार्थ आयडी फसवणूक प्रकरणात ते नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. या प्रकरणी त्यांना जामीन मंजूर झाला होता; परंतु जामिनावर ते कारागृहातून बाहेर येण्यापूर्वीच ग्रामीण पोलिसांनी ताबा घेतला आहे. उपासनी यांना बुधवारी (ता. १७) मालेगाव न्यायालयात हजर केले जाणार आहे.