Malegaon Municipal Corporation
sakal
मालेगाव: येथील महापौर व उपमहापौर पदासाठी ७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. निवडणुकीत इस्लाम पक्ष व समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटला ४० जागा मिळाल्या आहेत. सेक्युलर फ्रंटने कॉंग्रेसला सोबत घेत ४३ हा बहुमताचा आकडा गाठला आहे. महापौरपदासाठी इस्लाम पक्षाच्या नसरीनबानो खालिद अहमद यांनी चार, तर उपमहापौर पदासाठी समाजवादी पार्टीच्या शानेहिंद निहाल अहमद यांनी दोन अर्ज निवडणूक विभागाकडून घेतले. महापौरपदी नरसिनबानो तर उपमहापौरपदी शानेहिंद यांची निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.