Nashik : वाहतूक कोंडीमुळे मालेगावकर बेजार; मद्याची दुकाने ठरतात अडथळा

The evening traffic jam in the square here.
The evening traffic jam in the square here.esakal

मालेगाव शहर (जि. नाशिक) : आधीच दाटीवाटीचे शहर... त्यात वाहतुकीला अडथळे... त्यामुळे मालेगावात सायंकाळची वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. शहरातील मुख्य चौकातील दारू दुकानांमुळे संध्याकाळच्या कालावधीत वाहतूक कोंडी निर्माण होत असते. यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. (Malegaon people upset due Liquor shops hindrance to traffic jam Nashik Latest Marathi News)

शहरातील मुख्य रस्त्यावरच दारू विक्रीची दुकाने आहेत. यामध्ये गजबजलेल्या मोसम पूल, संगमेश्‍वर, सटाणा नाका, मोतीबाग नाका, रावळगाव नाका, डि. के. चौक, सोयगाव भागात मध्यवर्ती ठिकाणी वाईनशॉप असल्याने सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सायंकाळी सहानंतर मद्यपान करणारी बाहेरगावची मंडळी आपली तजवीज करण्यासाठी येतात. साधारण रात्री नऊपर्यंत ही लगबग असल्याने ‘पार्सल’ घेऊन तेथून निघण्याची घाई असल्याने वाहन कसेतरी रस्त्यावर लावतात. परिणामी, सामान्य नागरिकांच्या वाहनांची कोंडी होते. अशावेळी वाहतूक पोलिस नसल्याने बराच वेळ मार्गस्थ होण्यात जातो.

यात छोट्यामोठ्या प्रकारची बाचाबाची होते. विशेषत: रावळगाव नाका परिसरात शॉपच्या आसपास फास्ट फूड, चायनीज, अंडा भुर्जी अशा व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे नागरिकांची गर्दी असतेच. दारू दुकानासमोरील रस्त्यावर वाहने मात्र कोंडी करतात. याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने हा कित्ता रोजच गिरवला जात आहे. सायंकाळी महिला बाहेर पडतात. त्यानंतर हमखास वाहतुकीत अडकण्याचा प्रसंग येतो. त्यामुळे अनेकदा रस्ता बदलावा लागतो. या समस्येवर लक्ष देण्याची मागणी सामाजिक संस्था व नागरिकांनी केली आहे.

The evening traffic jam in the square here.
Nashik : वीज सुरक्षेसाठी अभियंत्याने रचले गीत; सावधानतेची जाणीव होण्यासाठी जनजागृती

पार्किंगची व्यवस्थाच नाही

संगमेश्‍वर, मोसम पूल, मोतीबाग नाका, डि. के. चौक, सटाणा नाका, रावळगाव नाका या मुख्य भागात परवानाधारक सहा दारू दुकाने आहेत.

या एकाही दुकानाला वाहनांची पार्किंगची सोय नाही. पार्किंगची व्यवस्था नसल्याने ‘तळीराम’ बिनदिक्कतपणे दुकानात जातात. काही घाई गडबडीत रस्त्यावरच दुचाकी, चारचाकी लावतात. यामुळे रावळगाव नाका येथे दररोज हमखास वाहतूक ठप्प होते. महसूल यंत्रणा व पोलिस यंत्रणा याकडे का दुर्लक्ष करते, हा प्रश्‍न पडतो.

"गेल्या अनेक वर्षांपासून कॅम्प भागात रावळगावनाका या महत्वाच्या चौकात वाईन शॉप आहे. याची परवानगी देताना भविष्यातील होणाऱ्या रस्त्यांवरची पार्किंगची समस्या विचारात घ्यायला हवी होती. या रस्त्यावर ५ ते १० मोठ्या शिक्षण संस्था आहेत. दिवसभर विद्यार्थी ये- जा करतात. सायंकाळी महिला बाजार, भाजीपाला घ्यायला येतात. त्यामुळे सदर वाईन शॉप स्थलांतरीत करण्याची गरज आहे." - सुशांत कुलकर्णी, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती

The evening traffic jam in the square here.
Onion Crop Crisis : बुरशीमुळे कांदा रोप संकटात; देवळ्यातील शेतकऱ्यांसमोर संकट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com