Bundukaka Bachhav
sakal
नाशिक
Malegaon Politics : मालेगावच्या राजकारणात मोठा भूकंप! अपक्ष नेते बंडूकाका बच्छाव भाजपच्या वाटेवर; २८ नोव्हेंबरला प्रवेशाची चर्चा!
Major Political Realignments Begin Ahead of Local Elections in Malegaon : मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे बंडूकाका बच्छाव यांनी भाजप कार्यालयाला भेट दिल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
मालेगाव: पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या राजकीय उलथापालथी होत आहेत. बिहार निवडणुकीचा जल्लोष सुरू असतानाच शुक्रवारी (ता.१४) येथील भाजप कार्यालयास बंडूकाका बच्छाव यांनी भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
