Malegaon Protest : मोठी बातमी ! मालेगाव अत्याचार प्रकरणी जनआक्रोश मोर्चाला हिंसक वळण, आक्रमक आंदोलक गेट तोडून कोर्टात घुसले

Protest in Malegaon : आरोपी विजय खैरनार (२४) याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. वाढत्या गर्दीमुळे आरोपीला प्रत्यक्ष न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.
Protest in Malegaon

A massive protest outside Malegaon court in Nashik district as citizens demand justice in a shocking child murder and assault case

esakal

Updated on

Summary

  1. मालेगावमध्ये चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणामुळे नागरिकांनी प्रचंड आक्रोश मोर्चा काढला.

  2. मोर्चादरम्यान आंदोलक आक्रमक झाले व कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला.

  3. पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

Protest in Malegaon: नाशिक जिल्ह्यातील मालेगावात चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकऱणात आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या दरम्यान आंदोलक आक्रमक झाले अन गेट तोडून शिरले. दरम्यान आंदोलकांना थांबविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. मालेगाव कोर्टाच्या परिसरात मोर्चेकऱ्यांची मोठी गर्दी झाली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पोलिस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com