Nashik News : माळेगाव होणार सर्वांत मोठी ‘MIDC’; एकरी 52 लाखांचा दर जाहीर

माळेगाव-सिन्नर औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी शेजारच्या मापारवाडी शिवारातील २०४ हेक्टर जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, यासाठी एकरी ५२ लाख रुपये दर जाहीर करण्यात आला आहे.
MIDC
MIDCesakal
Updated on

Nashik News : माळेगाव-सिन्नर औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी शेजारच्या मापारवाडी शिवारातील २०४ हेक्टर जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, यासाठी एकरी ५२ लाख रुपये दर जाहीर करण्यात आला आहे.

जमीनधारकांना त्यांचा मोबदला दिल्यावर उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल. (Malegaon will be largest MIDC in nashik district nashik news)

यामुळे माळेगाव-सिन्नर औद्योगिक वसाहतीतील जागेची टंचाई दूर होऊन नवीन उद्योग येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर माळेगाव- सिन्नर ही २२०० एकरवर वसलेली नाशिक जिल्ह्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत होईल.

माळेगाव-सिन्नर येथे १९९२ मध्ये सुरू झालेल्या औद्योगिक वसाहतीत उद्योगांना जागा उपलब्ध नसल्याने विस्तारासाठी माळेगाव वसाहतीलगतच्या मापारवाडी शिवारातील जमिनीचे संपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी माळेगावसाठी भूसंपादन करताना दरीतील क्षेत्रही घेण्यात आल्याने ते भूसंपादन वादात सापडले आहे. यामुळे मापारवाडीतील २०४ हेक्टर भूसंपादनाची प्रक्रिया थंडावली होती. मात्र, या २०४ हेक्टरमध्ये अनेक ‘वजनदार’ लोकांच्या जमिनी असल्याने भूसंपादनाला वेग आला आहे. सिन्नर एमआयडीसीतील टप्पा क्रमांक चारच्या भूखंडाचे दर ‘एमआयडीसी’ने जाहीर केले आहेत.

MIDC
Nashik News : निर्णयक्षमता विकसित करा : प्रतापराव पवार

निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी २०४.२३ हेक्टरसाठी २८१ कोटी ४२ लाख ८९ हजार ५०० रुपये मंजूर केले. शासनाने या भूसंपादनासाठी निफाड उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. त्यांनी याबाबत सर्व जमीनधारकांशी चर्चा करून १४ जुलै २०२२ ला जमिनीचे दर सरसकटपणे निश्चित केले.

मापारवाडी शिवार हा माळेगाव औद्योगिक वसाहतीला लागून असल्याने यापूर्वीच या भागात स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी गुंतवणूकदारांनी घेतल्या असून, त्यात अनेक राजकीय नेते, सरकारी अधिकारी व उद्योजकांच्या जमिनी आहेत. यामुळे या वाढीव दराचा फायदा सामान्य शेतकऱ्यांपेक्षा गुंतवणूकदारांनाच होणार असल्याचे दिसते.

शासनाने यात मोठ्या कंपन्यांना जागा द्याव्यात व मोठे उद्योग कसे येतील, याकडे लक्ष द्यावे. भूखंडाचे दर कमी ठेवण्यात यावे. गुंतवणूकदारांना औद्योगिक भूखंड देण्यात येऊ नये. टप्पा क्रमांक एकमध्ये एका मोठ्या गुंतवणूकदाराला फायदा पोहोचविण्यासाठी ४२ एकर दरीचे क्षेत्र संपादित करून शासनाची फसवणूक केली. त्या पद्धतीच्या बाबी या भूसंपादनात होऊ नये, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे.

MIDC
Nashik News : जिल्ह्यातील 2,341 शिक्षकांना प्रलंबित वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर

''माळेगाव औद्योगिक वसाहतीलगतच्या टप्पा क्रमांक एकमध्ये जमीन अधिग्रहित करताना ७० एकर दरीचे संपादन झाले. त्याचा भार उद्योजकांच्या माथी मारला. मापारवाडीत असे होऊ नये, सीमा संघटनेचीही हीच मागणी आहे.''- बबन वाजे, सचिव, सीमा संघटना

''मापारवाडीसाठी पहिल्या टप्प्यातील रकमेचे लवकरच वितरण सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गटांसाठी रक्कम उपलब्ध होताच अधिग्रहण होईल. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया सुरूच आहे.''- हेमांगी पाटील, उपविभागीय अधिकारी

MIDC
Nashik News : तक्रार नाही, मात करायची : प्रतापराव पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com